-महावीर सांगलीकर
Numerologist & Motivator
8149703595
8149703595
सुखी जोडप्यांच्या जन्मतारखा पाहिल्या तर लक्षात येते की दोघांचेही जन्मांक एकसारखेच किंवा एकमेकांना सुसंगत असतात. तसेच त्या दोघांचेही भाग्यांक एकसारखे किंवा एकमेकांना सुसंगत असतात. याउलट ज्या जोडप्यात तणाव आणि भांडणे असतात त्यांचे जन्मांक एकमेकांशी विसंगत असतात, किंवा भाग्यांक विसंगत असतात. त्यामुळे आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना जन्मांक व भाग्यांक यांच्या सुसंगततेचा विचार केलाच पाहिजे.
जोडीदाराची निवड करताना समान जन्मांक आणि समान भाग्यांक असणाऱ्या व्यक्तिला सर्वोच्च प्राथमिकता द्यावी. म्हणजे समजा तुमचा जन्मांक 3 आहे आणि भाग्यांक 5 आहे, तर तुमच्या जोडीदाराचा जन्मांकही 3 असावा आणि भाग्यांक 5 असावा. पण अशी जोडी जुळणे तसे कठीणच. त्यामुळे तुम्ही त्याच अंकाऐवजी इतर सुसंगत अंकांचा विचार करावा. जसे, 3 या अंकाशी पूर्ण सुसंगत असणारे अंक 6 आणि 9 आहेत, तर 5 या अंकाशी पूर्ण सुसंगत असणारे अंक 1 आणि 7 आहेत. आता परफेक्ट जोडीदार शोधण्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत:
तुमचा जन्मांक 3 भाग्यांक 5
अनुरूप जोडीदार :
जन्मांक 3, 6 किंवा 9
भाग्यांक 1, 5 किंवा 7
कोणते अंक कोणत्या अंकांशी सुसंगत आहेत हे लक्षात ठेवणे सोपे आहे.
1, 5, 7 हे एकमेकांशी पूर्णपणे सुसंगत अंक आहेत.
2, 4, 8 एकमेकांशी पूर्णपणे सुसंगत अंक आहेत.
3, 6, 9 एकमेकांशी पूर्णपणे सुसंगत अंक आहेत.
त्याचप्रमाणे पूर्णपणे सुसंगत नसले तरी बऱ्यापैकी खूपच सुसंगत असणारे अंकही असतात. ते पुढीलप्रमाणे:
1 या अंकाशी 3, 9
2 या अंकाशी 3, 6
3 या अंकाशी 1, 2, 5
4 या अंकाशी 6, 7
5 या अंकाशी 3, 9
6 या अंकाशी 2,4,8
7 या अंकाशी 4
8 या अंकाशी 6
9 या अंकाशी 1, 5
जोडीदार निवडताना पूर्णपणे सुसंगत अंक किंवा बऱ्यापैकी सुसंगत अंक असतील असे बघावे. पण जर संभाव्य जोडीदाराचे अंक अनुरूप नसतील तर अशा व्यक्तिशी लग्न करणे टाळावे.
एकमेकांशी सुसंगत नसणारे अंक (विसंगत अंक):
1 शी विसंगत अंक: 2, 4, 6
2 शी विसंगत अंक: 1, 5, 7
3 शी विसंगत अंक: 4, 7, 8
4 शी विसंगत अंक: 1, 3, 5, 9
5 शी विसंगत अंक: 2, 4, 6
6 शी विसंगत अंक:1, 5, 7
7 शी विसंगत अंक: 2, 3, 6, 8
8 शी विसंगत अंक: 3, 7, 9
9 शी विसंगत अंक: 4, 8
जर जन्मांक सुसंगत असतील पण भाग्यांक विसंगत असतील, किंवा याच्या उलटे भाग्यांक सुसंगत असतील आणि जन्मांक विसंगत असतील तर कौटुंबिक, नातेसंबंधातील समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जन्मांक आणि भाग्यांक दोन्हीही पूर्णपणे सुसंगत किंवा बऱ्यापैकी सुसंगत असावेत.
या माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या परफेक्ट जोडीदाराची निवड करू शकता. तुमचा जन्मांक आणि भाग्यांक काय आहे ते पहा आणि त्याप्रमाणे सुसंगत असणाऱ्या व्यक्तींमधून तुमच्या परफेक्ट जोडीदाराची निवड करा.
जन्मांक आणि भाग्यांक कसा काढावा याची माहिती पुढील ठिकाणी वाचावी:
जन्मांक (मुळांक) म्हणजे काय?
भाग्यांक म्हणजे काय?
(यात आणखीही कांही गोष्टींचा सूक्ष्म विचार करावा लागतो. त्यामुळे तुम्ही एक्स्पर्ट न्यूमरॉलॉजिस्टचा सल्ला घेणे जास्त चांगले ठरेल).
हेही वाचा:
प्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी
26चा आकडा आणि वैवाहिक जीवन
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
No comments:
Post a Comment