Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Thursday, 27 April 2017

कोणता जन्मांक चांगला?-महावीर सांगलीकर 
8149703595


कांही लोक विचारतात की अंकशास्त्रा नुसार कोणता जन्मांक चांगला असतो? कोणता जन्मांक वाईट असतो? याचं उत्तर म्हणजे कोणताही जन्मांक पूर्णपणे चांगला, किंवा पूर्णपणे वाईट नसतो. प्रत्येक जन्मांकाचे कांही चांगले गुण असतात, तर कांही वाईट गुण असतात. त्यामुळे एखाद्या जन्मांकाला चांगला अंक किंवा वाईट अंक म्हणता येत नाही. तुमचा जन्मांक कोणताही असला तरी तो तुम्हाला कांही चांगले तर कांही वाईट गुण देतो. हे गुण तुमच्यात उपजतपणे असतात. यातले कोणते गुण तुमच्यात डेव्हलोप होतात त्यावर तुमच्या आयुष्याचा प्रवास कोणत्या दिशेने होणार हे दिसते. 

उदाहरण म्हणून आपण 1 हा जन्मांक घेऊ. हा जन्मांक पुढाकार घेणे, नेतृत्व, टीम लीडरशिप, ठामपणा, व्यवस्थापन हे गुण तर हुकुमशाही वृत्ती, हेकेखोरपणा, बॉसिंग, सूडबुद्धी हे दुर्गुण देतो. आता हा जिचा जन्मांक आहे ती व्यक्ती उत्तम नेता, बॉस वगैरे बनू शकते, किंवा मग एक हुकुमशहा देखील होऊ शकते. 1 या जन्मांकाच्या बाबतीत असं म्हंटलं गेलाय की Number 1 person is either a perfect hero or a perfect villain!    
   
तुमच्यात चांगले गुण डेव्हलोप होणार की वाईट गुण डेव्हलोप होणार हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं. तुमच्या जन्मांकाबरोबरच तुमचा भाग्यांक आणि नामांक काय आहे, तुमच्या पूर्ण चार्टमध्ये कोणत्या अंकाचं रिपिटीशन झालंय आणि तुमच्या नेहमी सहवासात असणारी, तुमच्यावर सर्वात जास्त प्रभाव असणारी व्यक्ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, तिचा जन्मांक-भाग्यांक काय आहे वगैरे.  यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की केवळ एखाद्या जन्मांकाच्या गुण किंवा दुर्गुणावरून संबधीत  असेल किंवा कशी होईल हे ठरवता येत नाही. यासाठी किमान चार घटकांचा सूक्ष्म अभ्यास आणि एकूण 20 घटकांचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे अमुक जन्मांक चांगला किंवा वाईट असतो असं म्हणता येणार नाही. 

प्रत्येक जन्मांकात महानतेचे कांही विशिष्ट गुण असतात, जे इतर जन्मांकात नसतात.  तुमचा जन्मांक कोणताही असला तरी तुम्ही त्याच्या गुणांच्या आधारे महान बनू शकता. त्यामुळं तुम्हाला जर तुमचा जन्मांक वाईट आहे असं कोणी सांगितलं असेल तर ते चुकीचं आहे. 

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

Email Newsletter

इमेलने मराठी कथा, लेख, ईबुक्स, ऑफर्स मिळवा. त्यासाठी खालील फॉर्म भरा आणि सबमिट करा.

* indicates required

View previous campaigns.

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख