Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Friday 30 March 2018

बेजबाबदार टवाळखोर आणि संसर्गजन्य टवाळखोरी!

-महावीर सांगलीकर 
Numerologist & Motivator
08149703595 


अंकांच्या गुणदोषांचं विशेष संशोधन करताना मला असं दिसून आलं की कांही विशिष्ट जन्मांक किंवा भाग्यांक असणारे लोक टिंगल-टवाळी करणे, सतत विनोद सांगणे, गॉसिपिंग, विदुषकासारखे चाळे करणे, माकडचेष्टा करणे अशा बाबतीत आघाडीवर असतात. या सवयींच्यामुळे खरं म्हणजे त्यांचंच मोठं नुकसान होत असतं. पहिलं म्हणजे समाजात त्यांची इमेज ‘जोकर’ अशीच तयार होते, दुसरं म्हणजे ते बेजबाबदार बनतात. हे अंक कोणते हे इथं सांगणं योग्य ठरणार नाही. पण टवाळखोरांनी अशा सवयी सोडून दिल्यास त्यात त्यांचाच फायदा आहे.



समाजात आणि सोशल मेडियात टवाळखोरांची संख्या मोठी आहे. या लोकांना दुसऱ्यांची टिंगल-टवाळी करण्यात मजा वाटत असते. अर्थातच ही टिंगल-टवाळी त्या त्या व्यक्तीच्या समोर नव्हे तर माघारी केली जाते. (समोर टिंगल-टवाळी करण्याची यांच्यात कुठे आलीय हिम्मत). राजकीय नेत्यांची टिंगल-टवाळी करणे हा तर यांचा विशेष आवडीचा उद्योग असतो. हे राजकीय लोक यांना ओळखतही नसतात, आणि टवाळखोरांनी केलेली टिंगल-टवाळी या नेत्यांच्या पर्यंत पोहोचतही नसते. खरं म्हणजे त्या राजकीय नेत्याच्या पी.ए.चा नोकर होण्याचीही यांची योग्यता नसते. तरीपण हे लोक नेत्यांची टिंगल-टवाळी करतात, याचं कारण म्हणजे टिंगल टवाळी करण्याचा मनोविकार त्यांना झालेला असतो. हे टवाळखोर लोक मुळातच बेजबाबदार वृत्तीचे असतात. टिंगल-टवाळी करून आपण फार मोठे काम केले आहे असे यांना वाटत असले तरी प्रत्यक्षात यांच्या हातून स्वत:साठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी फार कांही भरीव काम होत नसतं. त्यांच्या टवाळखोरीबद्दल कोणी काय बोललं तर ते निर्लज्जपणे हसतात. एकप्रकारे हे लोक ‘जोकर’ असतात.

तुम्ही टिंगल-टवाळी करणाऱ्या लोकांशी मैत्री करणं टाळलं पाहिजे. कारण हा मनोविकार संसर्गजन्य आहे. टवाळखोरांच्या संगतीत तुम्हीही टवाळखोर बनण्याची शक्यता असते. शिवाय तुम्ही हेही जाणलं पाहिजे की टिंगल ही व्यक्तींची केली जाते, आणि व्यक्तींच्या बद्दल बोलणारे लोक हे सामान्य दर्जाचे असतात. तुम्ही  जे लोक संकल्पना, आयडियाज यांच्याबद्दल बोलतात, जे लोक क्रिएटिव्ह आहेत, भरीव कार्य करतात, आणि ज्यांच्याकडे महान ध्येये आहेत अशाच लोकांशी मैत्री केली पाहिजे.

हेही वाचा:


No comments:

Post a Comment

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख