Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Sunday, 15 November 2015

शरद पवार

-महावीर सांगलीकर 
8149703595शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यांची जन्म तारीख 12.12.1940 ही आहे. त्यानुसार त्यांचा जन्मांक 3 हा आहे तर भाग्यांक 2 आहे. त्यांच्या Sharad Pawar या नावानुसार त्यांचा नामांक 2 हा आहे. विशेष म्हणजे त्यांचा मासांक  हा  देखील त्यांच्या जन्मांकाएवढा म्हणजे 3 आहे (डिसेंबर=12=1+2=3), तर त्यांचा वर्षांक 5 (1940=1+9+4+0=14=1+4=5) आणि त्यांच्या PAWAR या आडनावाची अंकातली किंमत देखील 5 आहे.

त्यांच्या जन्मांक, भाग्यांक आणि नामांकानुसार त्यांचे विश्लेषण पुढीलप्रमाणे करता येते:

जन्मांक: 3
जन्मांक 3 असणाऱ्या व्यक्तींच्याकडे प्रचंड आकर्षण शक्ती असते. नेतृत्वगुणाच्या बाबतीत हा अंक 1 या अंकाइतकाच  चांगला मानला जातो. पवार साहेब त्यांच्या नेतृत्व गुणांच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत. पण 3 हा जन्मांक असणारे नेते जन्मांक किंवा भाग्यांक 1 असणाऱ्या नेत्यांपुढे दुय्यम ठरतात. (जसे इंदिरा गांधी जन्मांक 1, राजीव गांधी भाग्यांक 1, नरसिंह राव जन्मांक 1. पवार साहेबांना त्यांच्यावर कुरघोडी करता आली नाही). 3 हा जन्मांक असणारे लोक अनेकदा भावनेच्या भरात निर्णय घेतात. असे निर्णय चुकीचे ठरू शकतात. पवार साहेबांच्या बाबतीत ही गोष्ट अनेकदा घडलेली दिसते.

पवार साहेबांच्या कन्या सुप्रियाताई यांचा जन्मांकही 3 आहे. (जन्मतारीख 30 जून). असे असणे योगायोग वगैरे नसते, तर एखाद्या व्यक्तीची मुलगी अथवा मुलगा त्या व्यक्तीच्याच जन्मांकाचा असण्याची जास्त शक्यता असते.

भाग्यांक: 2 
2 हा अंक मुत्सद्दीपणा, कुशल वक्तृत्व, व्यवहार कुशलता  यांच्याशी संबधित आहे. या व्यक्ति मृदुभाषी असतात. पण या अंकाची दुसरी बाजू म्हणजे चंचलपणा, धरसोड वृत्ती आणि ऐनवेळी माघार घेण्याची वृत्ती. पवार साहेबांच्या बाबतीत 2 या अंकाचे गुण आणि दोष हे दोन्ही मोठ्या प्रमाणात दिसतात.

नामांक: 2 (11)
पवार साहेबांचा नामांक त्यांच्या भाग्यांकाएवढाच म्हणजे 2 आहे. हा नामांक त्यांच्या भाग्यांक 2चे गुणदोष वाढवतो.

S H A R A D
1  8  1 9  1  4  (या अंकांची बेरीज 24=2+4=6)

P A W A R
7 1   5  1  9   (या अंकांची बेरीज 23=2+3=5)
 6+5 =11=1+1=2

त्यांचा नामांक काढत असताना  त्यात 11 हा अंक येतो. हा एक मास्टर नंबर आहे. तो त्यांना अंतर्मुख बनवतो, तसेच प्रचंड यशही देतो. तसेच त्यांच्या पूर्ण नावात 1 हा अंक 5 वेळा आला आहे, तर 12.12.1940 या त्यांच्या जन्मतारखेत तो 3 वेळा आला आहे. म्हणजे पवार साहेबांच्या चार्टमध्ये 1 हा अंक एकूण 8 वेळा आला आहे. 1 या अंकाचे हे मोठे रिपिटेशन त्यांचे नेतृत्वगुण  मोठ्या प्रमाणात वाढवते.

शरद पवार यांची सही:
शरद पवारांच्या सहीमध्ये देखील त्यांची स्वभाव वैशिष्ठ्ये दिसून येतात. त्यांची खाली सही पहा:
या सहीची बेस लाईन ठिपकेदार रेघांमध्ये दाखवली आहे. सहीमध्ये श, प आणि शेवटचे र ही अक्षरे बेसलाईनच्या खाली आली आहेत. एखाद्या व्यक्तीच्या सहीमध्ये  असे खाली येणे असेल तर निश्चितच समजावे की त्या व्यक्तीला तिच्या आयुष्यात या ना त्या प्रकारे सेटबॅक मिळतील. पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीत असे सेटबॅक वारंवार बसलेले दिसतात.

या सहीमध्ये श आणि प या अक्षरात मोठी वर्तुळे तयार झाली आहेत. ही वर्तुळे म्हणजे पवार साहेब आपल्या मनाचा, पुढील चालींचा थांगपत्ता लागून देत नाहीत त्याच्या खुणा आहेत.

श, प, व या अक्षरात फुल्या (क्रॉसेस) आहेत. या फुल्या म्हणजे त्यांच्याकडून झालेल्या व होत असलेल्या राजकीय व इतर चुकांच्या खुणा आहेत.

सहीमधले  प  हे अक्षर पहा.  ते अक्षर पुढे जाऊन वरच्या दिशेने गेले आहे, मग ते अचानक मागे वळले आहे व स्वत:लाच क्रॉस करून खाली घसरले आहे. पवार साहेब कधी काय भूमिका घेतील ते सांगता येत नाही त्याचेच हे लक्षण आहे.
हेही वाचा:
इंदिरा गांधी
नरेंद्र मोदी
मोदींच्या सहीमध्ये दडलंय त्यांचं भवितव्य
देवेंद्र फडणवीस
अजित दादा पवार
तुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

Email Newsletter

इमेलने मराठी कथा, लेख, ईबुक्स, ऑफर्स मिळवा. त्यासाठी खालील फॉर्म भरा आणि सबमिट करा.

* indicates required

View previous campaigns.

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख