Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Friday 24 July 2015

एडॉल्फ हिटलर



-महावीर सांगलीकर
Numerologist & Motivator
8145313595


जन्मतारीख: 20 एप्रिल 1889
जन्मांक: 2
भाग्यांक: 5
नामांक: 2  
जन्मवर्षांक 26/8

हिटलरची जन्मतारीख वैशिष्ठ्यपूर्ण आहे. त्या तारखेचे अंकशास्त्रीय विश्लेषण केले असता अंकशास्त्र त्याला भलतेच लागू पडते असे दिसून येते.

हिटलरचा जन्मांक 2 आहे, तर भाग्यांक 5 आहे. हे दोन्ही अंक एकमेकांचे शत्रू अंक असले तरी काही बाबतीत परस्परांना पूरक आहेत. हिटलरमध्ये या दोन्ही अंकांचे गुणदोष आलेले दिसतात. त्याचे जन्मांक 2 नुसार आलेले गुण म्हणजे प्रचंड बुद्धिमत्ता, आकलनशक्ती, लोकसंग्रह  आणि सौंदर्यदृष्टी. हिटलर हा एक उत्कृष्ट चित्रकार होता हे तुम्हाला माहीत असेलच

भाग्यांक 5चे त्याचे गुण म्हणजे प्रभावी वक्तृत्व, तीक्ष्ण बुद्धी, झटपट विचार करण्याची निर्णय घेण्याची क्षमता, योजकता, सौंदर्य दृष्टी वगैरे. जन्मांक किंवा भाग्यांक 5 असणाऱ्याच्या आयुष्यात प्रेम आणि प्रेमविवाह होण्याची बरीच शक्यता असते. हिटलरच्या बाबतीत तसे झालेले दिसते.  

2 आणि 5 हे दोन्ही अंक मनासारखे झाले नाही तर नैराश्य आणतात. हिटलरला ही गोष्टही लागू होत होती.

विशेष म्हणजे हिटलरचा नामांक ही 2 होता! एवढेच नव्हे तर त्याच्या ADOLF या नावाची अंकातली किंमत ही 2 आहे. 

A D O L F   H I T L E R
1 4  6 3 6   8 9 2 3 5 9
या अंकाची बेरीज:
 20       +       36 = 56 =5+6 = 11 =1+1 =2
 20 = 2+0 =2

वर तुम्हाला 11 हा अंक दिसेल. तो एक मास्टर नंबर आहे जो हिटलरला ताकतवान बनवतो.

आता आपण हिटलरच्या जन्मसालाचा विचार करू. 1889 या सालातले सगळे अंक (1, 8, 9) हे वर्चस्ववादी अंक आहेत. त्यातला 8 हा अंक तर दोन वेळा आला आहे.  1889 या सालातील सर्व अंकांची बेरीज 26 येते. अंकशास्त्रात 26 हा अंक आपत्तीचा नंबर मानला गेला आहे. हिटलरने जगावर आजपर्यंतच्या इतिहासातली सर्वात मोठी मानव निर्मित आपत्ती आणली होती, ती म्हणजे दुसरे महायुद्ध. या महायुद्धात कोट्यावधी लोकांचा संहार झाला

हिटलरचा मृत्यू 30.4.1945 रोजी झाला. विशेष म्हणजे या तारखेची पूर्ण बेरीज 26 येते!

आता आपण हिटलरच्या जीवनात घडलेल्या घटनांमध्ये 2 आणि 5 या अंकाचे स्थान पाहू.

12.9.1919 जर्मन वर्कर्स पार्टीचा सदस्य झाला, राजकारणात प्रवेश. या तारखेची पूर्ण बेरीज 32=3+2=5  सदस्य नंबर 555!
11.11.1923 सरकार विरोधातील क्रांतीबद्दल अटक. 11=1+1=2
29.6.1921रोजी  हिटलर नाझी पार्टीचा अध्यक्ष झाला: 29=2+9=11=1+1=2
3.1.1933 रोजी हिटलर जर्मनीचा चान्सलर झाला: पूर्ण बेरीज 20=2+0=2 
2 ऑगस्ट 1934 रोजी हिटलर जर्मनीचा सर्वेसर्वा झाला.
1.9.1939 पोलंडवर आक्रमण, दुसऱ्या महायुद्धास सुरवात. या तारखेची पूर्ण बेरीज 32=3+2=5
29 एप्रिल 1945 रोजी हिटलरने आपली प्रेयसी इव्हा ब्राऊन हिच्याशी लग्न केले. 2+9=11=1+1=2 
हिटलरचा मृत्यू त्याच्या वयाच्या 56व्या वर्षी झाला. 56=5+6=11=1+1=2  
विशेष म्हणजे त्यांचा संसार 2 च दिवस टिकला!

हेही वाचा:


No comments:

Post a Comment

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख