Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Saturday, 6 June 2015

13 नंबरचे रहस्य: 13 हा अंक वाईट आहे का?

महावीर सांगलीकर
814 970 3595


13 हा अंक युरोप आणि अमेरिकेत अशुभ मानला गेला आहे. इतका की तिथे अनेक ठिकाणी घराला 13 नंबर द्यायचे टाळले जाते, अनेक हॉटेलमध्ये 13 नंबरची रूम नसते. चीनमध्येही प्राचीन काळापासून हा अंक अशुभ मानला गेला आहे. भारतात हा अंक अशुभ मानला गेला नसला तरी तो शुभ अंकांच्या यादीतही नाही.

13 तारखेला घडलेल्या अनेक दुर्घटना किंवा 13 या नंबरशी संबधीत घडलेल्या दुर्घटना यामुळे या अंकाच्या अशुभतेमध्ये भरच पडली.

अमेरिकेने चंद्रावर जाण्यासाठी अपोलो ही मोहीम आखली. त्यातले अपोलो 11 हे यान चंद्रावर उतरणारे पहिले यान होते. त्यानंतर कांही महिन्यात अपोलो 12 हे यानही चंद्रावर यशस्वीपणे उतरले. पण नेमके अपोलो 13 या यानाच्या ऑक्सिजनच्या टाकीला गळती लागली आणि हे यान अपयशी ठरले. विशेष म्हणजे हे यान नुसतेच अपोलो 13 नव्हते, तर ते दुपारी 13 वाजून 13 मिनिटांनी सोडण्यात आले होते. या घटनेमुळे अमेरिकेत आणि इतर ठिकाणी 13 या अंकाला आणखीनच अशुभ मानण्यात येऊ लागले.

भारतीय संसदेवर झालेला हल्ला ही भारताच्या इतिहासातील अत्यंत वाईट आणि अपमानकारक गोष्ट होती. हा हल्ला 13 तारखेस झाला होता.

13 या अंकात अनेक गूढ शक्ती आहेत.  जिचा  जन्म कोणत्याही महिन्याच्या 13 तारखेस झाला आहे, किंवा जिच्या पूर्ण जन्मतारखेची बेरीज 13 येते अशा व्यक्तिकडे कांही विशेष शक्ती असू शकतात. यात पुढे होणा-या घटनांची आगाऊ सूचना मिळणे, मनाने दूर अंतरावर संदेश पाठवणे किंवा मिळवणे, मोहिनी घालणे अशा गोष्टींचा समावेश होतो. या व्यक्ति हुशार असतात आणि त्यांच्याकडे विलक्षण तर्कबुद्धी असते. पण यांच्या भावना यांच्या तर्कबुद्धीवर मात करू शकतात.

हेही वाचा:
नंबर 26: आपत्तीचा नंबर
शक्तिशाली मास्टर नंबर्स 
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख