Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Wednesday, 27 May 2015

अंकशास्त्र: इंदिरा गांधी


महावीर सांगलीकर 
 8149703595


इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्व अतिशय वादळी होते. त्यांचे राजकीय जीवन प्रचंड यश आणि अडथळे यांनी भरलेले होते. त्यांचे कौटुंबिक जीवन अयशस्वी होते.

इंदिरा गांधी यांचा जन्मांक, भाग्यांक आणि नामांक यांचा त्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम झालेला दिसतो.

इंदिरा गांधी यांची जन्मतारीख 19 नोव्हेंबर 1917 ही होती.
जन्मांक: 1 (19=1+9=10=1+0=1)
भाग्यांक: 3 (19.11.1917 = (1+9) + (1+1) + (1+9+1+7) = (10+2+18 =30=3+0=3)
नामांक: 8
I N D I R A  G A N D H I
9 5 4 9 9 1    7 1 5  4  8 9
    (37)     +       (34) =71=7+1=8


वरील अंकांचे गुणदोष पहा:
1 नेतृत्वगुण, लोकसंग्रह, सत्ता, हुकुमशाही प्रवृत्ती 
3 उत्साह, आकर्षक व्यक्तिमत्व, नेतृत्वगुण, भावनांचा उद्रेक, अडथळे 
8 सत्ता, संघर्ष, अडथळे, हुकुमशाही प्रवृत्ती, कौटुंबिक कलह  

इंदिरा गांधी यांच्या जीवनात 9 हा अंक अनेकदा आलेला दिसतो. मुळात त्यांच्या नावात 9 हा अंक 4 वेळा आलेला आहे:
I N D I R A  G A N D H I
9 5 4 9 9 1    7 1 5  4  8 9 

INDIRA या नावाची अंकातली किंमत 37=3+7=10=1 येते जो त्यांचा जन्मांकही  आहे. 

आता आपण त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना पाहू:
1917: जन्मसाल, पूर्ण बेरीज 18=9 
26.3.1942: फिरोझ गांधी यांच्याशी लग्न. 26=8, पूर्ण बेरीज 27=9. लग्न 26 तारखेला झाले, त्यानुसार त्याचे निगेटिव्ह परिणाम दिसून आले. (26 हा अंक  Number of Disaster म्हणून ओळखला जातो,  त्यामुळे अंकशास्त्रात  हा अंक शुभ कार्यासाठी वापरू नये असा सल्ला दिला जातो).
1971: लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश,  भारत पाकिस्तान युद्ध,  भारताचा प्रचंड विजय: 1971 पूर्ण बेरीज 18=9 (1971 या अंकात इंदिरा गांधी यांचे  जन्मसाल असलेल्या 1917 या अंकातील सगळे आकडे आलेले आहेत ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे).  
युद्धामध्ये पाकिस्तान भारताला शरण: 16.12.1971 पूर्ण बेरीज 28=1  
25.6.1975: देशात आणीबाणी जाहीर: पूर्ण बेरीज 35=8
1980: लोकसभेच्या  निवडणुकीत प्रचंड यश. 1980 पूर्ण बेरीज 18=9 
(1980 या अंकात त्यांचा जन्मांक 1, 3 शी जवळचा संबंध असणारा 9 आणि नामांक 8 हे तीनही अंक आलेले आहेत!)
1980: मुलगा संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू पूर्ण बेरीज 18=9
मृत्यू 31.10.1984 पूर्ण बेरीज 27= 9

उल्लेख करण्यासारखी आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या ते साल (1966), त्यांनी आणीबाणी जाहीर केली ते साल (1975) आणि त्यांचा मृत्यू झाला ते साल (1984) यात एक समान धागा आहे, तो म्हणजे या तीनही सालातील अंकांची बेरीज 22 येते. 22 हा मास्टर नंबर आहे.
(या लेखात मी इंदिरा गांधी यांच्या जीवनातील फक्त महत्वाच्या घटनांचा विचार केला आहे).

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख