Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Tuesday, 3 March 2015

जन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31

 -महावीर सांगलीकर
8149703595


ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, अशा व्यक्ति इतर तारखांना जन्मणा-यापेक्षा फार वेगळ्या स्वभावाच्या असतात.

यांची मुख्य विशेषता म्हणजे या व्यक्ति इतरांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करतात, आणि त्या मांडत असलेले विचार इतरांच्यापेक्षा खूपच वेगळे असतात. म्हणजे तुम्ही एखाद्या नाण्याच्या छाप्याबद्दल बोलत असाल तर  या व्यक्ति काट्याबद्दल बोलतील, आणि नाण्याला केवळ दोनच बाजू नसून तीन बाजू असतात हेही दाखवून देतील.  वरवर विचार करण्या ऐवजी हे लोक खोलवर विचार करत असल्याने इतरांना असे वाटते की ते मुद्दाम आपले म्हणणे खोडून काढत आहेत. त्यात या व्यक्तींचा स्वभाव कांहीसा आक्रमक, फटकळ, स्पष्टवक्तेपणाचा असल्याने ब-याचदा समोरच्याचे मन दुखावले जाते.

यांचा स्वभाव बंडखोर असतो आणि त्या प्रसंगी अत्यंत कठोर बनू शकतात.

आपल्या कामाच्या बाबतीत या व्यक्ति ‘परफेक्शनिस्ट’ असतात. या व्यक्ति ज्या क्षेत्रात काम करतात, तेथे त्यांच्याकडून फार मोठे, अविश्वसनीय काम होवू शकते. या व्यक्ति या ना त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात येतात.

परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख मेळ यांच्या जीवनात, कामात दिसून येतो.

या व्यक्ति पैशाला फारसे महत्व देत नाहीत. पैसा ही गोष्ट त्यांच्यासाठी दुय्यम असते. तसेच या व्यक्ति ‘अतिहुशार’ या सदरात मोडत असले तरी झटपट पैसे मिळवण्याचे ते टाळतात, आणि पैसे त्यांच्या बौद्धिक कष्टानेच मिळवत असतात. त्यांच्यापैकी क्वचित कोणी झटपट पैसे मिळवण्याच्या मागे लागले तर ते तो त्याच्या अनोख्या मार्गाने मिळवतोही, पण तो निश्चितपणे गोत्यात येतो.

या व्यक्तिंना भरपूर मित्र आणि भरपूर शत्रूही असतात. ज्यांचा जन्मांक 2, 4 किंवा 8  आहे त्यांचे आणि या व्यक्तिंचे चांगलेच मेतकूट जमते.  8 जन्मांक असणाऱ्या व्यक्तिंशी यांचे चांगले पटते आणि भांडणेही होतात.  तसेच जन्मांक 5 असणाऱ्या व्यक्तिंशी यांचे हाय लेव्हल, बौद्धिक नाते असते.

जन्मांक 4 असणाऱ्या प्रसिद्ध  प्रसिद्ध व्यक्ति
जॉर्ज वाशिंग्टन, महाराणा प्रताप, राजाराम मोहन रॉय, दादाभाई नौरोजी,मायकेल फॅराडे,सर ऑर्थर कॉनन डॉयल,सरदार वल्लभ भाई पटेल, कर्मवीर भाऊराव पाटील, बराक ओबामा.

वरील यादीवर नजर टाकली तर त्यांच्यात ‘खमके’ राजकारणी, बंडखोर समाज सुधारक आणि जिनिअस व्यक्ति झालेल्या दिसतात.

हेही वाचा:

1 comment:

  1. वरील लेख वाचताना, माझ्या विषयी बऱ्याच गोष्टींमध्ये मला साधर्म्य आढळून आलं आहे. एकंदरीत माझ्या बाबतीत आजवर जे काही घडलं किंवा घडत आहे. ते अगदी तंतोतंत आहे. खूप सुरेख शास्त्र आणि अभ्यास..
    धन्यवाद..

    ReplyDelete

Email Newsletter

इमेलने मराठी कथा, लेख, ईबुक्स, ऑफर्स मिळवा. त्यासाठी खालील फॉर्म भरा आणि सबमिट करा.

* indicates required

View previous campaigns.

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख