Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Tuesday 8 December 2015

कौटुंबिक समस्या आणि अंकशास्त्र

-महावीर सांगलीकर 
8149703595



अनेक कुटुंबांमध्ये कांहीतरी कौटुंबिक समस्या असतात. नवरा-बायकोची भांडणं, सासू-सुनांची भांडणं,   बायकोनं कायमचे माहेरी निघून जाणं, घटस्फोट, बाप-मुलाची भांडणं,  भावा-भावाची भांडणं, संवादाचा अभाव वगैरे. ज्यांची नेहमी आणि टोकाची भांडणं  होतात त्यांच्या जन्मतारखा बघितल्यास असं दिसतं की त्यांचे जन्मांक एकमेकांना अनुकूल नसतात. तसेच कांही विशिष्ट जन्मांक असणाऱ्यांचं कुणाशीच पटत नसतं. समस्या असणाऱ्या बहुतेक कुटुंबामध्ये एकतरी व्यक्ति असे विशिष्ट जन्मांक असणारी असते.

प्रत्येक व्यक्तिचा जुळवून घेण्याचा किंवा न घेण्याचा स्वभाव तिच्या जन्मांकानुसार ठरलेला असतो. त्यात बदल करणे ही फार अवघड गोष्ट असते. पण कांही अंकशास्त्रीय ट्रिक्स वापरून ‘जुळवून न घेण्याच्या ’ स्वभावात कमी काळात बऱ्यापैकी बदल करता येतो. यासाठी विशिष्ट अंकाचा, तारखांचा त्या-त्या व्यक्तिच्या लकी नंबर्सचा, रंगांचा वापर करण्याचा तसेच कांही अंक, तारखा आणि रंग टाळण्याचा सल्ला दिला जातो. कांही वेळा नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला जातो. समुपदेशन केले जाते. या उपायांच्यामुळं कौटुंबिक समस्या सुटत असल्याचं दिसून येतं.

हेही वाचा:
अंकशास्त्र म्हणजे काय?
जन्मांक (मुळांक) म्हणजे काय?
अंक आणि करीअर
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

Monday 7 December 2015

ब्लादिमीर पुतिन

-महावीर सांगलीकर 
8149703595



रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांची जन्मतारीख आणि नाव हे दोन्हीही अंकशास्त्राच्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. त्यांची जन्मतारीख 7 ऑक्टोबर 1952 ही आहे. त्यानुसार त्यांचा जन्मांक 7 येतो तसेच भाग्यांकही 7 येतो. त्यांच्या VLADIMIR या नावाची अंकातली किंमतही 7 येते, तर त्यांच्या PUTIN या आडनावाचे पहिले अक्षर P याचीही किंमत 7 आहे!

7.10.1952= (7)+ (1+0)+(1+9+5+2)=7+1+17=25=2+5=7

VLADIMIR
43149499 बेरीज 43=4+3=7

PUTIN
73295 बेरीज 26 =2+6=8

या प्रकारे पुतिन यांच्या चार्टमध्ये 7 हा अंक चार वेळा आलेला आहे. (जन्मांक, भाग्यांक, नामांक (First Name) आणि आडनावाचे पहिले अक्षर).



7 हा अंक उद्योग, व्यवसाय, धर्म आणि आध्यात्मिकता यांच्याशी संबधित आहे. याशिवाय या अंकाचे आणखीन एक मोठे वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे या अंकाशी संबधीत लोक अतिशय गुप्तता बाळगणारे (Secretive Nature) असतात. त्यामुळे ते सिक्रेट सर्व्हिसमध्ये काम करण्यासाठी अतिशय योग्य असतात. पुतिन हे रशियाच्या केजीबी या गुप्तहेर संघटनेत लेफ्टनंट कर्नल होते. ते या संघटनेत 16 वर्षे  होते. (16=1+6=7). पुन्हा 7!

1996 मध्ये त्यांनी त्यावेळचे अध्यक्ष बोरीस येल्त्सिन यांच्या ऑफिसमध्ये रूजू झाले आणि तिथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली. 1996= 1+9+9+6=25=2+5=7.

25 जुलै 1998 रोजी येल्त्सिन यांनी पुतिन यांना एफएसबी या वेगळ्या गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखपदी निवड केली. 25=2+5=7, जुलै=7.

16 ऑगस्ट 1999 रोजी पुतिन यांची रशियाच्या पंतप्रधानपदी निवड झाली. 16=1_6=7

7 मे 2007 ला ते रशियाचे अध्यक्ष झाले आणि पुन्हा 7 मे 2012ला दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले.

विशेष म्हणजे त्यांनी शाळेत जायला सुरवात केली ते साल होते 1960. याची एक अंकी बेरीज 7 येते.

वर म्हंटल्याप्रमाणे 7 हा अंक धर्म आणि आध्यात्मिकतेशी संबधीत आहे. पुतिन हे ऑर्थोडक्स ख्रिश्चन आहेत आणि नियमितपणे चर्चला जातात. (रशिया कम्युनिस्ट देश होता त्यावेळीही तिथले लोक धर्मपालन करत असत. आता तर तिथं  धर्माला अधिकृत मान्यता आहे.).

PUTIN=26
पुतिन या नावाची अंकातली किंमत 26 आहे. ज्यांच्या चार्टमध्ये हा नंबर दिसतो त्यांच्या वैवाहिक जीवनात कांही ना कांही मोठी बाधा येत असते. पुतिन यांचा ते अध्यक्षपदी असतानाच घटस्फोट झाला आहे.
26 हा अंक अतिशय शक्तिशाली असून तो आपत्तीचा नंबर म्हणून ओळखला जातो. पुतिन हे अतिशय आक्रमक आहेत आणि अमेरिकेच्या जागतिक पोलीसगीरीला आळा घालण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. नजीकच्या काळात यातून तिसऱ्या महायुद्धाची आपत्ती येण्याची शक्यता आहे. त्याची लक्षणे आत्ताच दिसू लागली आहेत.



हेही वाचा:
एडॉल्फ हिटलर
इंदिरा गांधी
मार्क झुकेरबर्ग
नरेंद्र मोदी
बिल, हिलरी आणि मोनिका
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन


Sunday 22 November 2015

राहुल गांधी

-महावीर सांगलीकर 
Numerologist & Graphologist
8149703595


अनेक लोक, ज्यांना राहुल गांधी यांची नीट माहिती नाही आणि जे मेडिया व राहुल-विरोधकांचे ऐकून राहुल गांधी यांच्या विषयी आपले निगेटिव्ह मत बनवतात, ते मोठी चूक करत आहेत. पण राहुल गांधी यांच्या जन्मतारखेवरून सांगता येते की त्यांच्याकडे अनेक गुण आहेत आणि आणि नजिकच्या भविष्यात त्यांना मोठ्या संध्या मिळणार आहेत. 

राहुल गांधी यांची जन्म तारीख 19 जून 1970 आहे. त्यानुसार त्यांचा जन्मांक 1 येतो तर भाग्यांक 6 येतो. त्यांचा नामांक 4 येतो.

जन्मांक:

19=1+9=10=1+0=1

अंकशास्त्रात हा अंक 1 ते 9 या अंकांमध्ये सर्वात चांगला मानला गेला आहे. हा जन्मांक असणारे लोक उपजतपणे नेतृत्व गुण असणारे, लढाऊ, पुढाकार घेणारे, ठाम, उमद्या व्यक्तिमत्वाचे असतात. 

19 तारीख ही विशेष शक्तिशाली असते. या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीमध्ये 1 या अंकाचे गुणदोष जास्त प्रमाणात दिसून येतात, तसेच 9 या अंकाचे गुणदोष ही असतात. 9 हा अंक लढाऊ वृत्ती देतो. 
(विशेष म्हणजे राहुल गांधी यांची आज्जी इंदिरा गांधी यांची जन्मतारीखही 19 होती).

भाग्यांक:

19.6.1970= (1+9)+ (6) + (1+9+7+0)= 10+6+17=33=3+3=6

(त्यांच्या RAHUL या नावाचा नामांकही 6 येतो.)
6 भाग्यांक  असणाऱ्या व्यक्तिंना प्रचंड आत्मविश्वास असतो. या व्यक्ति मानवतावादी आणि इतरांची काळजी घेणाऱ्या असतात. हा अंक त्यांच्या जन्मांक 1 चे दुर्गुण कमी करतो.

त्यांच्या पूर्ण जन्मतारखेची बेरीज 33 येते.  33 हा एक मास्टर नंबर आहे आणि तो त्यांना भावनाशील बनवतो.

नामांक:

R A H U L

9 1 8 3 3 बेरीज 24
G A N D H I
7 1 5 4 8 9 बेरीज 34
24+34= 58 =5+8 =13= 1+3= 4

हा नामांक तर्कनिष्ठ विचार, स्पष्टवक्तेपणा आणि नियोजनबद्ध काम करण्याची क्षमता देतो. 

सोल अर्ज नंबर 5 (नावातील स्वरांची अंकातील किंमत).
5 हा अंक त्यांना चाणाक्ष, चलाख आणि 

पर्सनॅॅलिटी नंबर 44 (नावातील व्यंजनांची अंकातील किंमत)
44 हा एक मास्टर नंबर आहे. हा अंक सत्ता, संपत्ती, नियोजनबद्धता, व्यवस्थापन कौशल्य देतो.
राहुल गांधी यांचे अंक राजकारण क्षेत्रात काम करण्यासाठी योग्यच आहेत. पण उद्योग क्षेत्रात काम केले असते तर ते मोठे आणि यशस्वी उद्योगपति झाले असते!

दोन मास्टर नंबर्स 
राहुल गांधी यांच्या पूर्ण चार्ट मध्ये 2 मास्टर नंबर्स आहेत. एक म्हणजे त्यांच्या जन्म तारखेतील अंकांची बेरीज 33 आहे, आणि त्यांचा पर्सनॅॅलिटी नंबर 44 आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये 2 मास्टर नंबर्स असतील तर ते त्या व्यक्तीला प्रचंड यश मिळवून देऊ शकतात.

2019: पर्सनल इयर 1 
एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख, जन्म महिना आणि चालू वर्ष यातील अंकांची बेरीज म्हणजे पर्सनल इयर होय. 2019 हे राहुल गांधी यांच्यासाठी पर्सनल इयर 1 आहे. 19.06.2019 = 1+9+0+6+2+0+1+9   = 28 = 2+8 =10 = 1+0 =1. शिवाय 2019 या सालात 19 हा अंकही आहे, जी राहुल गांधी यांची जन्मतारीख आहे. 2019 या सालातील अंकांची बेरीज 12 = 1+2 = 3 येते. 3 हा अंक त्यांच्या जन्मांक 1 आणि भाग्यांक 6 या दोन्हींशी सुसंगत आहे. एखाद्या वर्षात असे योग जुळून आले तर ती व्यक्ती त्या वर्षात मोठे यश मिळवू शकते. त्यामुळे एकुणात 2019 हे वर्ष राहुल गांधी यांना प्रचंड यश देणारे ठरणार आहे यात कांही शंका नाही. 2019 मध्ये राहुल गांधी पंतप्रधान झाले तर त्यात कांही विशेष नाही. 

हेही वाचा:
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
तुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!

इंदिरा गांधी
नरेंद्र मोदी
शरद पवार
देवेंद्र फडणवीस
अजित दादा पवार


Sunday 15 November 2015

शरद पवार

-महावीर सांगलीकर 
Numerologist, Graphologist
8149703595



शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यांची जन्म तारीख 12.12.1940 ही आहे. त्यानुसार त्यांचा जन्मांक 3 हा आहे तर भाग्यांक 2 आहे. त्यांच्या Sharad Pawar या नावानुसार त्यांचा नामांक 2 हा आहे. विशेष म्हणजे त्यांचा मासांक  हा  देखील त्यांच्या जन्मांकाएवढा म्हणजे 3 आहे (डिसेंबर=12=1+2=3), तर त्यांचा वर्षांक 5 (1940=1+9+4+0=14=1+4=5) आणि त्यांच्या PAWAR या आडनावाची अंकातली किंमत देखील 5 आहे.


त्यांच्या जन्मांक, भाग्यांक आणि नामांकानुसार त्यांचे विश्लेषण पुढीलप्रमाणे करता येते:

जन्मांक: 3
जन्मांक 3 असणाऱ्या व्यक्तींच्याकडे प्रचंड आकर्षण शक्ती असते. नेतृत्वगुणाच्या बाबतीत हा अंक 1 या अंकाइतकाच  चांगला मानला जातो. पवार साहेब त्यांच्या नेतृत्व गुणांच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत. पण 3 हा जन्मांक असणारे नेते जन्मांक किंवा भाग्यांक 1 असणाऱ्या नेत्यांपुढे दुय्यम ठरतात. (जसे इंदिरा गांधी जन्मांक 1, राजीव गांधी भाग्यांक 1, नरसिंह राव जन्मांक 1. पवार साहेबांना त्यांच्यावर कुरघोडी करता आली नाही). 3 हा जन्मांक असणारे लोक अनेकदा भावनेच्या भरात निर्णय घेतात. असे निर्णय चुकीचे ठरू शकतात. पवार साहेबांच्या बाबतीत ही गोष्ट अनेकदा घडलेली दिसते.

पवार साहेबांच्या कन्या सुप्रियाताई यांचा जन्मांकही 3 आहे. (जन्मतारीख 30 जून). असे असणे योगायोग वगैरे नसते, तर एखाद्या व्यक्तीची मुलगी अथवा मुलगा त्या व्यक्तीच्याच जन्मांकाचा असण्याची जास्त शक्यता असते.

भाग्यांक: 2 
2 हा अंक मुत्सद्दीपणा, कुशल वक्तृत्व, व्यवहार कुशलता  यांच्याशी संबधित आहे. या व्यक्ति मृदुभाषी असतात. पण या अंकाची दुसरी बाजू म्हणजे चंचलपणा, धरसोड वृत्ती आणि ऐनवेळी माघार घेण्याची वृत्ती. पवार साहेबांच्या बाबतीत 2 या अंकाचे गुण आणि दोष हे दोन्ही मोठ्या प्रमाणात दिसतात.

नामांक: 2 (11)
पवार साहेबांचा नामांक त्यांच्या भाग्यांकाएवढाच म्हणजे 2 आहे. हा नामांक त्यांच्या भाग्यांक 2चे गुणदोष वाढवतो.

S H A R A D
1  8  1 9  1  4  (या अंकांची बेरीज 24=2+4=6)

P A W A R
7 1   5  1  9   (या अंकांची बेरीज 23=2+3=5)
 6+5 =11=1+1=2

त्यांचा नामांक काढत असताना  त्यात 11 हा अंक येतो. हा एक मास्टर नंबर आहे. तो त्यांना अंतर्मुख बनवतो, तसेच प्रचंड यशही देतो. तसेच त्यांच्या पूर्ण नावात 1 हा अंक 5 वेळा आला आहे, तर 12.12.1940 या त्यांच्या जन्मतारखेत तो 3 वेळा आला आहे. म्हणजे पवार साहेबांच्या चार्टमध्ये 1 हा अंक एकूण 8 वेळा आला आहे. 1 या अंकाचे हे मोठे रिपिटेशन त्यांचे नेतृत्वगुण  मोठ्या प्रमाणात वाढवते.

शरद पवार यांची सही:
कोणत्याही व्यक्तीच्या सहीमध्ये त्या व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ठयांची लक्षणे दिसून येतात. शरद पवारांच्या सहीमध्येदेखील त्यांची स्वभाव वैशिष्ठ्ये दिसून येतात. त्यांची पुढे दिलेली सही पहा:









या सहीची बेसलाईन ठिपकेदार रेघेत  दाखवली आहे. सहीमध्ये श, आणि प या अक्षरांचा मोठा भाग बेसलाईनच्या खाली उताराला आहे. एखाद्या व्यक्तीच्या सहीमध्ये  असे खाली येणे असेल तर निश्चितच समजावे की त्या व्यक्तीला तिच्या आयुष्यात या ना त्या प्रकारे मोठे सेटबॅक्स मिळत रहातील. पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीत असे सेटबॅक्स वारंवार मिळालेले दिसतात.

या सहीमध्ये श आणि प या अक्षरात मोठी वर्तुळे तयार झाली आहेत. ही वर्तुळे म्हणजे पवार साहेब आपल्या मनाचा, पुढील चालींचा थांगपत्ता लागून देत नाहीत त्याच्या खुणा आहेत.

श, प, व या अक्षरात फुल्या (क्रॉसेस) आहेत. या फुल्या म्हणजे त्यांच्याकडून झालेल्या व होत असलेल्या राजकीय व इतर चुकांच्या आणि येणाऱ्या अडथळ्यांच्या खुणा आहेत.

सहीमधले  प  हे अक्षर पहा.  ते अक्षर पुढे जाऊन वरच्या दिशेने गेले आहे, मग ते अचानक मागे वळले आहे व स्वत:लाच क्रॉस करून खाली घसरले आहे. 'पवार' मधील व या अक्षरात देखील मागे वळणे हा प्रकार दिसतो. पवार साहेब कधी काय भूमिका घेतील ते सांगता येत नाही त्याचेच हे लक्षण आहे.  शरद पवार कोलांटी उडी घेतात त्याचे  हे लक्षण आहे. तसेच सहीमध्ये अचानक मागे वळणे हे  बॅकफूटवर  जावे लागण्याचे लक्षण आहे.

पवार साहेबांच्या या सहीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सही मधली अक्षर सुट्टी-सुट्टी आहे. सहीमध्ये अशी सुट्टी-सुट्टी अक्षरे असणारी व्यक्ती इतरांच्यात फारशा गुंतून रहात नाही.




हेही वाचा:

इंदिरा गांधी
नरेंद्र मोदी
मोदींच्या सहीमध्ये दडलंय त्यांचं भवितव्य
देवेंद्र फडणवीस
अजित दादा पवार
तुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

Saturday 17 October 2015

देवेंद्र फडणवीस


-महावीर सांगलीकर
8149703595, 9145318228



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जन्मतारीख 22 जुलै 1970 आहे.
जन्मांक 4 (22=2+2=4)
भाग्यांक 1 (2+2+7+1+9+7+0=28=2+8=10=1+0=1)

जन्मांक 4
हा जन्मांक असणाऱ्या व्यक्ति कोणत्याही गोष्टीचा खोलवर आणि तर्कनिष्ठ विचार करणाऱ्या, प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू पहाणाऱ्या, स्पष्टवक्त्या, योजनाबद्ध काम करणाऱ्या असतात.

भाग्यांक 1 
हा भाग्यांक त्यांना नेतृत्वगुण आणि पुढाकार घेण्याची ताकत देतो.

नामांक 5
DEVENDRA
45455491
बेरीज 37=3+7=10=1+0=1
FADNAVIS
61451491
बेरीज 31=3+1=4
1+4=5
नामांक 5 हा त्यांना झटापट विचार आणि झटपट निर्णय घेण्याची टाकत देतो.
त्यांच्या नावात 4 हा अंक 5 वेळा आला आहे, तर 5 हा अंक 4 वेळा आला आहे. हे रिपिटेशन त्यांच्या जन्मांक 4 आणि नामांक 5 चे गुणदोष वाढवते.

मास्टर नंबर 22 
त्यांची जन्मतारीख 22 हा एक मास्टर नंबर आहे. हा मास्टर नंबर त्यांना मोठमोठी कामे करण्याची ताकत देतो.

एखाद्या व्यक्तिच्या चार्टमध्ये 1 आणि 22 हे दोन्ही अंक असणे हे दुर्मिळ असते आणि अशा व्यक्तिंमध्ये अदभूत महान कार्य करण्याची उपजत शक्ती असते.

++

आता आपण देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनात 4 या अंकाने बजावलेल्या महत्वाची भूमिका बघू.
वयाच्या 22 व्या वर्षी ते नागपूर  महानगरपालिकेचे पहिल्यांदाच नगरसेवक झाले. 22=2+2=4, (शिवाय 22 ही त्यांची जन्मतारीख आहे).
ते 4 थ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि या 4थ्या टर्ममध्ये त्यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.
31 ऑक्टोबर 2014 रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 31=3+1=4
देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनात घडलेल्या इतर महत्वाच्या घटनांच्या तारखा मिळाल्यास त्यांच्याविषयी अंकशास्त्रीय दृष्टीतून अधिक लिहिता येईल.

हेही वाचा: 

अजित दादा पवार 
नरेंद्र मोदी 
इंदिरा गांधी 
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

Friday 9 October 2015

बिल, हिलरी आणि मोनिका

-महावीर सांगलीकर 
8149703595, 9145318228


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना त्यांची बायको हिलरी क्लिंटन ही मारहाण करत असे अशी बातमी प्रकाशित झाली आहे. ही मारहाण मुख्य करून बिल क्लिंटन यांची इतर स्त्रियांशी असणाऱ्या जवळकीमुळे होत असे. बिल क्लिंटन यांचे मोनिका लेवेन्स्की हिच्याशी असणारे संबंध प्रसिद्धच आहेत.
इथे मी बिल, हिलरी आणि मोनिका या तिघांचेही अंकशास्त्रीय विश्लेषण करत आहे.

बिल क्लिंटन Bill Clinton
जन्मतारीख: 19.08.1946
जन्मांक: 1 भाग्यांक: 3 नामांक: 5
Bill Clinton या नावात 3 या अंकाचे 4 वेळा रिपिटेशन झाले आहे. (l, l, c, l)
या अंकांचे गुण:
1= नेतृत्व, पुढाकार
3= रोमान्स, भावनांचे प्रदर्शन, नेतृत्व
5= रोमान्स, जोडीदाराशी अप्रामाणिकता, अनेकांशी संग

हिलरी क्लिंटन Hillary Clinton
जन्मतारीख: 26.10.1947
जन्मांक: 8 भाग्यांक: 3 नामांक: 1
Hillary Clinton या नावात 3 या अंकाचे 4 वेळा रिपिटेशन झाले आहे. (l, l, c, l)
या अंकांचे गुण:
8= कौटुंबिक कलह, तापट स्वभाव, सत्ता, संपत्ती
3= रोमान्स, भावनांचे प्रदर्शन, नेतृत्व
1= नेतृत्व, पुढाकार

मोनिका लेविस्न्की Monica Lewinsky
जन्मतारीख: 23.07.1973
जन्मांक: 5 भाग्यांक: 5 नामांक: 2
Monica Lewinsky या नावात 5 या अंकाचे चार वेळा रिपिटेशन झाले आहे. (n, e, w, n)
या अंकांचे गुण:
5: रोमान्स, जोडीदाराशी अप्रामाणिकता
2: भिन्नलिंगी व्यक्तिबद्दल अतिरिक्त शारीरिक आकर्षण, चंचलता.

विशेष म्हणजे हिलरी क्लिंटन या पेशाने वकील होत्या व हा पेशा जन्मांक 8 असणाऱ्या व्यक्तींना लाभदायक असतो. तसेच  मोनिका लेविस्न्की पेशाने फॅशन डिझायनर आहेत आणि हा पेशा जन्मांक 5
असणाऱ्या व्यक्तींना लाभदायक असतो.

हेही वाचा:
प्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारी...

Sunday 4 October 2015

अजित दादा पवार

-महावीर सांगलीकर
 9145318228


अजित दादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव आहे. त्यांची जन्मतारीख 22 जुलै 1959 ही आहे.

त्यांचा जन्मांक 4 आहे, [22=2+2=4] तर भाग्यांक 8 आहे.
[22.07.1959= (2+2) + (0+7) + (1+9+5+9) = (4) + (7) + (24) =35=3+5=8].

जन्मांक 4:
या अंकाचे गुण म्हणजे तर्कनिष्ठ विचार, ठाम मते, स्पष्टवक्तेपणा आणि त्यातून येणारा फटकळपणा, योजनाबद्ध काम करण्याची पद्धत.

त्यांची जन्मतारीख 22 हा एक मास्टर नंबर आहे. हा मास्टर नंबर त्यांना मोठमोठी कामे करण्याची ताकत देतो.

भाग्यांक 8: 
हा अंक त्यांना सत्ता, धन, संपत्ति, अडथळे देतो. हा अंक उशीर लावणारा अंक आहे.

नामांक: 1
AJIT DADA PAWAR
1192 4141 71519
(13) + (10)+ (23)=46=4+6=10=1

1 हा नामांक त्यांना नेतृत्वगुण देतो. त्यांच्या नावात 1 हा अंक 6 वेळा आला आहे. 1 या अंकाचे हे रिपिटेशन त्यांच्या नेतृत्वगुणाला आणखी बळ देते. त्यांच्या AJIT या नावाची अंकातली किंमत 4 आहे. ही गोष्ट त्यांच्या जन्मांक 4 चे गुणदोष बळकट करते.

जन्मांक 4 भाग्यांक 8 असा योग असेल तर ती व्यक्ति मोठे भौतिक यश मिळवते.

जन्मांक+भाग्यांक+नामांक (4+8+1=13=1+3=4). ही बेरीज अजित दादा यांच्या जन्मांकाएवढीच आहे. तसेच ती त्यांच्या AJIT या नावातील अंकांची बेरीजही 13 येते.  इथे पुन्हा 13 आणि 4 या अंकाचे रिपिटेशन पहायला मिळते.

अजित दादा पवार यांच्यावर  त्यांच्या जन्मांक 4, भाग्यांक 8, नामांक 1, मास्टर नंबर 22 या सगळ्यांचाच मोठा प्रभाव दिसून येतो.

त्यांच्या भावी कारकीर्दीत 2018, 2020, 2024 तसेच त्यांच्या वयाची 58, 62  ही वर्षे महत्वाची ठरतील. या सर्व वर्षांमध्ये त्यांना अनुकूल आणि महत्वाच्या अपेक्षित आणि अनपेक्षित घटना घडू शकतात. त्यांच्या अंकांमध्ये मुख्यमंत्री होण्याचा योग आहे.

हेही वाचा:
अंकशास्त्र: इंदिरा गांधी
अंकशास्त्र: नरेंद्र मोदी
अंकशास्त्र: नरेंद्र दाभोलकर आणि अब्राहम कोवूर
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

Friday 25 September 2015

मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM


तुम्हाला पैशांची सतत चणचण भासते? उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे? येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत? लोक पैसे बुडवतात? व्यवसाय नीट चालत नाही? कर्जबाजारी झाला आहात? काय व्यवसाय करावा हे समजत नाही? तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत, पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना? व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही? तुमच्या या अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे.

या कोर्सचे वैशिष्ट्य म्हणजे तो सकारात्मक विचार, व्हिज्युलायझेशन, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र आणि कांही गूढ रहस्यमय प्रयोग यांच्यावर आधारीत आहे. हा कोर्स तुमच्या मनातील पैशांविषयी नकारात्मक विचार काढून टाकतो. एकदा का तुमचे मन सकारात्मक झाले आणि तुम्ही मी शिकवलेल्या गोष्टी अमलात आणल्यात की तुमच्याकडे सर्व बाजूंनी पैशांचा ओघ सुरू होतो.

या कोर्समध्ये प्रवेश घेतल्यावर तुम्हाला सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक 15 दिवसाला 2 असे एकून 12 धडे पाठवले जातील. त्याचबरोबर तुम्हाला कांही प्रयोग करायला सांगितले जातील. तुम्हाला दिल्या जाणाऱ्या सूचना whatsapp, इमेल फोनवरून दिल्या जातील.

कोर्सची भाषा: मराठी

पात्रता:
या कोर्समध्ये भाग घेण्यासाठी पुढील पात्रता असणे आवश्यक आहे:
  1. तुमच्याकडे स्मार्ट फोन असावा
  2. इमेल whatsapp यांचा वापर करता येणे आवश्यक
  3. शिक्षण किमान 12 वी
  4. मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक
  5. इंग्रजीचे सामान्य ज्ञान आवश्यक
  6. नकारात्मक विचार आणि निरर्थक विषयांवर बोलण्याची सवय टाकून देण्याची तयारी

कोर्स:
  1. माइंड युवर ओन बिझनेस: तुमच्याकडे पैशांचा प्रवाह यायला पाहिजे असेल तर तुमच्या मनात सतत तुमचा व्यवसाय आणि पैसे यांचाच विचार असायला पाहिजे. या पहिल्या धड्यात ज्या गोष्टींशी तुमचा संबंध नाही अशा गोष्टींची चर्चा करणे, विचार करणे, निरर्थक वादविवाद करणे, निरर्थक प्रकारचे ज्ञान मिळवणे, उपयोगी गोष्टी शिकण्याचे टाळणे, तुमचे मन भरकटेल अशा प्रकारची पुस्तके वाचणे अशा अनेक सवयींपासून तुमची सोडवणूक केली जाते. तुम्हाला मध्यमवर्गीय मानसिकतेतून बाहेर काढले जाते आणि पॉझिटिव्ह बनवले जाते.
  2. पैशांचे महत्व: लहानपणापासून तुमच्यावर तुमच्या पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने पैशांविषयी चुकीच्या कल्पना आणि नकारात्मक विचार बिंबवलेले असतात. हा दुसरा धडा तुमच्या मनात पैशांचे महत्व बिंबवतो आणि तुम्हाला पैशांविषयी सकारात्मक बनवतो.
  3. व्यवसाय की नोकरी?: पैसे मिळवण्यासाठी तुमच्याकडे तुमचा स्वत:चा एखादा व्यवसाय असणे किंवा तुम्ही कुठेतरी नोकरी करणे गरजेचे असते. तुम्ही व्यवसाय करावा की नोकरी? व्यवसाय करायचा असल्यास कोणता व्यवसाय करावा? नोकरी करायची असल्यास कोणती नोकरी करावी? याचे तुम्हाला मार्गदर्शन केले जाते. हे मार्गदर्शन तुमची आवड, शैक्षणिक पात्रता आणि अंकशास्त्र या गोष्टींचा विचार करून केले जाते.
  4. काय वाचाल तर प्रगती कराल?: जी पुस्तके वाचल्यामुळे तुमच्या विचारात आमुलाग्र बदल होईल अशा पुस्तकांची यादी. यात मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमधील अनेक पुस्तकांचा समावेश आहे. त्यापैकी कांही पुस्तके तुम्हाला माझ्याकडून भेट म्हणून दिली जातील.
  5. बिझनेस सिक्रेट्स: तुमच्या व्यवसायात सहज यश मिळवण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन.
  6. वेळेची किंमत: तुम्हाला जेंव्हा वेळेची किंमत कळते तेंव्हाच तुमची भरभराट होते. तुमचा वेळ कसा आणि कुठे वापरावा याचे सखोल मार्गदर्शन.
  7. लोकसंग्रह: तुम्ही तुमचा लोकसंग्रह वाढवला, योग्य लोकांशी मैत्री केली तर त्याचा तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी फायदा होतो. लोकसंग्रह कसा वाढवावा, मैत्री कुणाशी करावी, लोकसंग्रहाचा फायदा कसा करून घ्यावा याची सखोल माहिती.
  8. मनी मेडीटेशन: तुमच्याकडे पैशांचा ओघ सतत वहाता रहावा यासाठी कसे चिंतन करावे याचे मार्गदर्शन. व्हिज्युलायजेशन, आकर्षणाचा नियम (Law of Attraction), ध्यानधारणा, प्रार्थना यांची अदभूत ताकतीची माहिती. ही ताकत तुम्हाला सहजपणे श्रीमंत बनवते.
  9. जे पाहिजे ते मिळवा!: तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ते मिळतं आणि जेव्हढं पाहिजे तेव्हढं मिळतं. ते कसं मिळवायचं याची रहस्यं.
  10. श्रीमंत होण्याचे दीर्घकालीन धोरणी उपाय: यामुळे तुमच्यासाठी पैशांचे अनेक स्रोत तयार होतात.   
  11. अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांचा उपयोग: यांच्या योग्य वापराने तुमच्याकडे पैसे आकर्षित होतात. या दोन्ही शास्त्रानुसार पैसे आकर्षित करण्याविषयी मार्गदर्शन.
  12. पैसेच पैसे चोहीकडे: कांही साध्या ट्रिक्सच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्याकडे पैशांचा प्रवाह आकर्षित करता येतो. अशा ट्रिक्सची आणि त्या ट्रिक्स कशा वापरायची याची माहिती.
फी
फी ाविषयक माहिती आणि या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी 8149703595 या नंबरवर फोन करावा.
-महावीर सांगलीकर
Numerologist, Motivator


सूचना: या कोर्समध्ये मर्यादित लोकांनाच प्रवेश दिला जातो.

हेही वाचा:


Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख